शबनम न्युज / पुणे
पुणे | प्रतिनिधी
प्रयास फाऊंडेशन , पुणे ह्या सेवाभावी संस्थेतर्फे गरजू महीलांसाठी मोफत ब्युटीपार्लर प्रशिक्षण कोर्स सुरु करण्यात आला आहे. सध्याची कठीण परिस्थिती पहाता महीलांनी आर्थिकद्रुष्टया सक्षम होणे आवश्यक आहे.
महीला सक्षमीकरणाची गरज ओळखुन प्रयास फाऊंडेशन ने गरजू महीलांसाठी मोफत ब्युटीपार्लर प्रशिक्षण हा उपक्रम सुरू केला आहे त्याद्वारे प्रशिक्षण घेऊन महीला घरगुती स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकतील व कुटुंबास आर्थिक हातभार लावु शकतील. आज दिनांक २२/७/२१ रोजी ह्या उपक्रमाची सुरवात करण्यात आली प्रयास फाऊंडेशन च्या अध्यक्षा डॅा. सौ सोनाली भामरे ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
ह्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां सौ निवेदिता कछवा , सौ अनघा शेवाळे , सौ मारिया थॅामस ह्या उपस्थित होत्या. प्रशिक्षक सौ अर्चना सातव व उपक्रमांत सहभागी होणार्या सर्व महीला उपस्थित होत्या.
ह्या वेळी प्रयास फाऊंडेशन तर्फ पुढील काळात असे अनेक समाजऊपयोगी उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सौ सोनाली भामरे ह्यांनी सांगितलं.