शबनम न्यूज | शिरोळ
कोल्हापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्याअंतर्गत शिरोळ जि. कोल्हापूर येथे पद्माराजे विद्यालयातील पूरग्रस्तांच्या निवारा केंद्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. व पद्माराजे विद्यालयातील निवारा केंद्रात पूरग्रस्त जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट दिली.
हि बातमी पण वाचा : Pune : शहरात रात्री ८ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्याची मुख्यमंत्र्यांसोबत झालेली चर्चा सकारात्मक - उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, शिरोळ चे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे आदी मान्यवर उपस्थित होते.