पुणे , औंध मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्रकार
शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे औंध मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्समध्ये भ्रष्टाचार झाला, या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी रयत शिक्षण संस्था वतीने समिती नेमण्यात आली या समितीचा अहवाल तक्रारदार विद्यार्थ्यांना मिळावा तसेच दोषींवर निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा रयत विद्यार्थी परिषद वतीने अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा रयत विद्यार्थी परिषद वतीने रयत शिक्षण संस्था सातारा चे चेअरमन अनिल पाटील तसेच सचिव विठ्ठल शिवणकर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध चे प्राचार्य अरुण आंधळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स चालतात या मध्ये भष्टाचार झाल्याने या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी समिती सचिवांमार्फत नेमण्यात आली होती. त्या नेमण्यात आलेल्या समितीने 7 ते 8 महिन्यात चौकशी करून चौकशी समिती अहवाल तयार केलेला आहे आणि त्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष प्राचार्य. पांडुरंग गायकवाड साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेकडे जमा केलेला आहे हा नेमलेल्या समितीचा अहवाल आम्हास तक्रारदार म्हणून उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे असे सांगत रयत विद्यार्थी परिषद वतीने अहवालाची मागणी करण्यात आली तीन ते चार महिने उलटून सुद्धा सदर अहवाल विद्यार्थ्यांना देण्यात आलेला नाही.
रयत विद्यार्थी परिषद वतीने रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील प्राचार्य यांना वारंवार पत्रव्यवहार केला परंतु तरीसुद्धा चौकशी समितीचा अहवाल उपलब्ध झाला नाही आणि दोषींवर कारवाई देखिल करण्यात आली नाही . यासंदर्भात रयत शिक्षण संस्था प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. या सर्व प्रकारांचा निषेध म्हणून आम्ही रयत विद्यार्थी परिषद वतीने सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी 13 ऑगस्ट 2021 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोर सकाळी 11:00 वा आमरण उपोषण करणार आहेत अशी माहिती दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे
रयत विद्यार्थी परिषद वतीने प्रमुख मागण्या :-
1) प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशी समितीचा अहवाल आम्हास उपलब्ध करून देण्यात यावा.
2) शॉर्ट टर्म कोर्स मधून शैक्षणिक वर्ष 2010-11 ते 2016-17 रोजी पर्यंत शॉर्ट टर्म कोर्स मधून जमा झालेल्या निधीतून खर्च निधी वजा करता उरलेली रक्कम सर्व विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी.
3) महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स मधील भ्रष्टाचाराची संपूर्ण जबाबदारी म्हणून प्राचार्य मंजुश्री बोबडे मॅडम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
4) परशुराम बोबडे यांनी विद्यापीठ परीक्षा पेपर स्वतंत्र वेगळ्या वर्गात बसून कॉपी करून सोडलेले आहेत त्यामुळे त्यांची ही पदवी रद्द करण्यात यावी.