अजंठा नगर येथे विश्वास रिक्षा स्टँड चे कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आणि नगरसेविका योगिता ताई नागरगोजे यांच्या हस्ते उद्घाटन आरपीआयचे बाळासाहेब भागवत होते उपस्थित
शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
अजंठानगर हा परिसर झोपडपट्टी आणि नागरीसलमवस्ती म्हणून ओळखला जातो या भागात कामगार कष्टकरी वर्ग राहत आहे , स्वतःची वाहन वेवस्था नसल्यामुळे रात्री-बेरात्री नागरिकांना रिक्षा मिळत नाही रात्री-अपरात्री महिला प्रस्तुती वेळी हॉस्पिटल तसेच इतर कारणासाठी काही व्यक्ती जास्त रिक्षा भाडे घेतात, यामुळे रात्री बारा ते पहाटे चार या वेळात विश्वास रिक्षा स्टँड च्या वतीने हॉस्पिटल व इतर तातडीच्या कारणासाठी मोफत रिक्षा सेवा दिली जाणार आहे विश्वास या नावाने रिक्षास्टँड या ठिकाणी उद्घाटन होत आहे रिक्षाचालकवरील विश्वास अधिक घट्ट करण्यासाठी हे स्टँड काम करेल असे या वेळी माजी नगरसेवक विश्वास गजरमल म्हणाले.
अजंठा नगर येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलंगन विश्वास रिक्षा स्टँड चे उद्घाटन महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आणि स्थानिक नगरसेविका योगिताताई नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायात अध्यक्ष बाबा कांबळे, नगरसेविका योगिता नागरगोजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, माजी नगरसेवक, रावसाहेब सरवदे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पाधाधिकारी, ॲड रूपवते साहेब, रमेश वाघमारे, मेजर साबळे साहेब, श्रीरंग जोगदंड, अंकुश साबळे. आदी उपस्थित होते.
नगरसेविका योगिता नागरगोजे म्हणाल्या शहरात रिक्षा चालक नागरी प्रवासी देत आहेत त्यांचे योगदान फार महत्त्वाचा आहे महानगरपालिकेच्या वतीने आम्ही त्यांना वेळोवेळी मदत सहकार्य केलेला आहे पुढील काळात देखील रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करू.
यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षा स्टँडवर पानपोई, वाचनालय असे समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले पाहिजे या रिक्षा स्टँडवर जागा उपलब्ध असल्यामुळे याठिकाणी वाचनालय आणि पाणपोई तसेच नागरिकांना बसण्यासाठी बाकडे याची व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात यावी नागरिक आणि रिक्षाचालक सुसंवाद वाढला पाहिजे असे झाल्यास नागरिकांना अधिक चांगली प्रवासी सेवा देण्याचं काम रिक्षा चालक करू शकतात असा मला विश्वास आहे.
यावेळी बाळासाहेब भागवत म्हणाले सामाजिक उपक्रम राबवत असताना आम्ही निळा झेंडा घेऊन नेहमी आपल्या सोबत आहोत, आता निवडणुका जवळ आल्या आहेत मत मागण्यासाठी सर्वजण रिक्षाचालकांन जवळ येतील, या वेळी आपल्या संकटकाळात कोण व्यक्ती आपल्या सोबत होती हे रिक्षाचालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रिक्षा स्टँड चे अध्यक्ष राम अल्कुंटे, उपाध्यक्ष विशाल सरवदे, अमर गायकवाड, दादा दाभाडे, धनंजय गवळी, उमेश गायकवाड, दिपक साबळे, बाबासाहेब सरवदे, महादेव अवसरमल, यांनी परिश्रम घेतले.