शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पि.चि.मनपा नागरवस्ती विकास योजना विभाग अंतर्गत मागासवर्गीय कल्याणकारी योजना माता रमाई आंबेडकर इयत्ता पाचवी ते दहावी शिकत असणाऱ्यांनी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पाचवी ते सातवीच्या पात्र लाभार्थ्यांना रुपये ४०००/- तर आठवी ते दहावीच्या पात्र लाभार्थ्यांना रुपये ६०००/- शिष्यवृत्तीसाठी सौ प्रियांका प्रविण बारसे जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.
तसेच विधवा महिलांना घरगुती व्यवसायासाठी मदत रु.१००००/-
दिव्यांग पेंशन दरमहा रू. २०००/-
दहावी-बारावी ८०% च्यावर गुण मिळवणारेंना रु.१००००/- व रु.१५०००/- शिष्यवृत्ती.
कोरोनामुळे निराधार झालेल्या पाल्यांना- महीलांना रु.२५०००/- अनुदान अशा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक,महिला, विद्यार्थी यांचा राबता वाढला आहे.
या अर्जासाठी आधार कार्ड( पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील) ,मतदार ओळखपत्र( पालकांचे) विद्यार्थी विद्यार्थिनीचा अनुसूचित जाती-जमाती,भटक्या जमाती,विमुक्त जाती असल्याचा जातीचा दाखला,कोरोनामुळे मयत पतीचा मृत्युदाखला तसेच
मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.
हे अनुदान विद्यार्थी किंवा पालकांच्या खात्यात डायरेक्ट जमा होते
प्रभाग क्रमांक पाच मधील पात्र महीला,विद्यार्थी तसेच पालकांना लवकरात लवकर हे अर्ज भरून देण्यासाठी नगरसेविका सौ प्रियांका प्रविण बारसे यांनी आवाहन केले आहे. जेणेकरून कोणीही पात्र उमेदवार या अनुदानापासून या योजनांपासून वंचित राहू नये.