शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरातील यमुना नगर साईनाथ नगर व सेक्टर क्रमांक 22 ऑटो स्कीम या भागात पाण्याच्या ओढ्याच्या पात्रात व सभोवताली मोठ्या प्रमाणात राडारोडा व कचरा साठलेला असल्याने ओढ्यातील पाण्याला अडथळा निर्माण होऊन या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली व त्यामुळे या ओढ्याला कचराकुंडीचे स्वरूप आले, गेल्या काही दिवसापासून निगडी परिसरातील ओढ्यात काही नागरिक बिंदास्तपणे कचरा टाकत असल्याने ओढ्याला कचराकुंडी स्वरूप आल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला ही सर्व बाब या परिसरातील पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रसाद कोलते यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्पर्ततेने निगडीतील फ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी यांना निवेदन देऊन ओढ्याच्या प्रदूषण पातळी कडे लक्ष वेधले.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पुण्यामध्ये कचरा टाकल्यामुळे एक प्रकारे कचराकुंडीचे स्वरूप आले असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय अंधाराचा व आडोशाचा फायदा घेत सर्रासपणे काही बेकायदेशीर प्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या वतीने होत असल्याने या सर्व परिस्थितीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाकडून ओढ्याच्या पुलावर लवकरात लवकर कुंपण बसून घ्यावे व कचरा टाकणे तसेच अनैतिक प्रकार करणे, या गोष्टी टाळण्यासाठी ओढा नाला हा साफसफाई करून त्या स्वभावताली ओढ्यांवर लवकरात लवकर तारेचे कंपाउंड अर्थात कुंपण बसविण्यात यावे. अशी मागणी केली.
तसेच निगडी, यमुनानगर, साईनाथ नगर व सेक्टर 22 येथील ओढ्याच्या परिसरातील नागरिक कचरा व प्लास्टिकचे पिशव्या टाकत असल्याने ओढ्याला कचऱ्याचे स्वरूप आले आहे. तसेच प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे ओढ्याचे पाणी कायम तुंबलेल्या अवस्थेत पाहायला मिळत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यासोबतच ओढ्यात आडोशाच व अंधाराचा फायदा घेऊन सर्रास अनैतिक प्रकार घडत असल्याचे वेळोवेळी त्यांनी दर्शनास येत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारांना प्रतिबंध म्हणून प्रशासनाकडून ओढ्याच्या पुलावर कुंपण बसविण्यात यावे, असे सदर निवेदनात प्रसाद कोलते यांनी म्हटले आहे.