शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
शहराला पाणी पुरवठा गरजेचे पण भामा आसखेड मधील जॅकवेलमध्ये भष्टाचार होत असेल तर निविदा रद्द करून परत रिटेंडर करा, अशी मागणी शहर मनसे वतीने सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पिंपरी, यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेल च्या कामाची मूळ निविदा १२१ कोटी रुपयाची असताना १५१ कोटी रुपयाची निविदा सादर करण्यात आलेली आहे व यासंदर्भात संबधित ठेकेदाराला काम देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे.
यासंदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तपत्रात मागील काळात या कामात भ्रष्टाचार होतोय अशी माहिती समोर आलेली होती. तरी आम्ही आपणास नम्र विनंती करतो याची सविस्तर माहिती आम्हास द्यावी व खरच या कामात भ्रष्टाचार होत असेल तर हि निविदा रद्द करण्यात यावी. व परत रिटेंडर करा, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहरअध्यक्ष बाळा दानवले, राजु सावळे आदी उपस्थित होते.