शबनम न्यूज | चिखली
पुणे शहरातील चिखली येथे 22 मे 2023 रोजी सोन्या तापकीर याचा गोळीबार करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना अटक करण्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाला यश आले आहे.
सराईत गुन्हेगार करण रतन रोकडे (वय 25, रा. आंबेडकर भवन समोर, चिंतामणी नगर, रोकडे वस्ती, चिखली) तसेच त्याचे तीन साथीदार ऋत्विक उर्फ मुंग्या रतन रोकडे (रा. चिखली), रिंकू दिनेश कुमार (वय 19, रा. चिखली) तसेच त्यांच्यासोबत एक विधी संघर्षित बालक यांना गुंडाविरोधी पथकाने भारत नेपाळ बॉर्डर वरून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना घडल्यानंतर सर्व आरोपी हे लोणावळा, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळे ठिकाणी बदलून राहत होते. गुंडाविरोधी पथकाला याबाबत माहिती मिळताच सापळा रचून सर्व आरोपींना अटक करून पिंपरी चिंचवड येथे आणून त्यांना चिखली पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त गुन्हे, स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.व्ही.माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक (तांत्रिक विश्लेषण विभाग( सागर पानमंद तसेच पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभीरे, सुनील चौधरी, नितीन गेंगजे, श्याम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली.