भोसरी ( मोशी ) प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नेते माजी नगरसेवक वसंत बोराटे यांचा वाढदिवस येत्या रविवारी 9 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे. माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर भरगच्च सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. सकाळी दहा वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात येणार आहे तसेच सकाळी 11 वाजता इयत्ता दहावी व बारावी मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच याच दिवशी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे अशी माहिती वसंत शेठ बोराटे युवा मंच वतीने देण्यात आली आहे,
.
तसेच सध्या आखाड महिना सुरू आहे यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा .तसेच प्रभागातील नागरिकांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम रामकृष्ण लॉन्स मंत्रा सोसायटी शेजारी घेऊन देहू रस्ता मोशी येथे सायंकाळी ७ वाजल्या पासून सुरु होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवावी असे आवाहन माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केले आहे.