पिंपरी चिंचवड :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तेविसावा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात पिंपरी-चिंचवड शहरात 23 अशा वृक्षांचे रोपण करण्यात आले. जे मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त ठरतील, आरोग्यासाठी आयुर्वेद युगात अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे वृक्ष यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीच्या झोपडपट्टी सेल वतीने दापोडीतील आई उद्यान येथे तेवीस झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले हे वृक्षारोपण या परिसरातील माजी नगरसेविका स्वाती ( माई ) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
देशाचे आशास्थान, अखंड भारताचे स्वप्न पाहणारे दूरदृष्टीचे लोकनेते आदरणीय श्री शरद चंद्रजी पवार यांच्या सामर्थ्यशील नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली आणि बघता बघता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देदीप्यमान २४ व्या वर्षात पदार्पण केले ही अत्यंत आनंदाची बाब त्या प्रित्यर्थ या वर्धापन दिनानिमित्त आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे सांगून राष्ट्रवादीच्या झोपडपट्टी सेलच्या शहराध्यक्षसौ सुनिताताई आडसुळे यांनी पुढे सांगितले कि , आपण व आपल्या परिजनांनी कोरोना सारख्या भयंकर काळात अनेक अडचणींचा सामना केला या काळात आपल्याला आरोग्यदायी जीवन जगण्याचे महत्व समजले तसेच आरोग्यदायी जीवन आपल्याला यापुढेही जगता यावे या उद्देशाने आपण अशा 23 वृक्षांची निवड केली ते 23 वृक्ष आयुर्वेद युगातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे वृक्ष आहेत ते भविष्यात अनेक काळापर्यंत मानवाला उपयोगी पडतील व मानवाला आरोग्यदायी जीवन जगता येईल अशा या तेवीस वृक्षांचे वृक्षारोपण आपण या राष्ट्रवादीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त केले असल्याची भावना राष्ट्रवादीच्या झोपडपट्टी सेलच्या शहराध्यक्षसौ सुनिताताई आडसुळे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना व्यक्त केली.
यावेळी झोपडपट्टी शहर अध्यक्षा सौ सुनिताताई आडसुळे,पर्यावरण शहर अध्यक्ष विनय शिंदे ,उपाध्यक्ष संदिप पाटील,पर्यावरण उपाध्यक्ष सुलेमान शेख,योगेश आयवळे सा.का.युवराजदादा गायकवाड,निजाम शाह,पुणेशहर महिला अल्पसंख्यांक नाजिया शेख ,आकिल खाटिक,करण कणसे,शिलाताई गायकवाड,जयाताई गायकवाड ,अन्सारी मॅडम,अश्विन आडसुळे,शिल्पा शिंदे,भारत गायकवाडआदि मान्यवर उपस्थित होते.