दापोडी – अल्फा लावल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथील अल्फा लावल कर्मचारी कामगार संघटनेच्या 14 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने व्यवस्थापनाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 419 रक्तदात्यांनी उत्साहात सहभाग घेतला यामध्ये प्रामुख्याने कामगार, कर्मचारी,ट्रेनी,मॅनेजर व सर्व कंत्राटी कामगार यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श उभा केला आहे. सर्व रक्तदात्याचे यूनियन कमिटी सदस्यांनी धन्यवाद व आभार मानले.
“आमच्या अल्फा लावल कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात आणि प्रत्येक कार्यक्रमात कामगार, कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि सहभाग कायम असतो. कामगारांच्या खिलाडूवृत्तीला वाव देत आगामी काळात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे तसेच विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.” अशी माहिती युनियन अध्यक्ष किरण देशमुख यांनी दिली.
तसेच या वेळी ज्येष्ठ कामगार राजेंद्र बेडसे यांच्या हस्ते कामगार संघटनेच्या नाम फलकाचे पूजन करून अनावरण करण्यात आले.
युनियन अध्यक्ष किरण देशमुख, उपाध्यक्ष रवींद्र धाडवे, विजय गायकवाड, जनरल सेक्रेटरी सारंग शिंदे, सेक्रेटरी तानाजी बोरे, खजिनदार समीर इंदलकर, सदस्य अधिक जगताप, अजय पाटील, मंगेश लिपारे, सोमनाथ नामधारे, सचिन हुपरे यांनी वर्धापन दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.