शबनम न्युज | पिंपरी (वृत्तसंस्था)
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. थेरगाव मध्ये सात वर्षीय मुलगी मृत अवस्थेत आणि वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भाऊसाहेब बेदरे (वय ४३) आणि मुलगी राजनंदनी भाऊसाहेब बेद्रे (वय ७ वर्ष) असे मृत वडील आणि मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री या आज पहाटेच्या सुमारास गावावरून आल्या. शिवाजीनगर बस स्थानकातून पती भाऊसाहेब यांना त्यांनी फोन केला. त्यांचं बोलणं देखील झालं. मात्र, ते गाडी घेऊन आलेच नाहीत. पत्नी राजश्री या थेरगाव येथील राहत असलेल्या ठिकाणी आल्या. तेव्हा त्यांनी घराच्या दरवाजा ठोठावला. मुलगा आशिष ने दरवाजा उघडला. मात्र, वडील कुठे आहे? असं विचारलं. घरात पाहिला असता किचनमध्ये भाऊसाहेब याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं. तर सात वर्ष राजनंदनी मृत अवस्थेत आढळली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली भाऊसाहेब यांनी आधी राजनंदनीचा दोरीने गळा होऊन हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर भाऊसाहेब यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास थेरगाव पोलीस करीत आहेत.