देहूरोड | शबनम न्यूज
मुंबईला जाण्याचा रस्ता विचारण्यासाठी थांबलेल्या तरुणाकडून दुचाकीवर स्वार असणाऱ्या तिघांनी मिळून 30 हजार रुपये किमतींचा एवज लंपास केला. त्यामध्ये 25 हजार रुपये किमतीचे लॅपटॉप आणि 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन असा एवज
तीन अज्ञात चोरांनी हिसकावून नेला असल्याची घटना 14 एप्रिल रोजी दुपारी 1 वाचण्याच्या सुमारास मुकाई चौक किवळे येथे घडली. या प्रकरणी गौतम विनोद भारद्वाज (वय 19, रा. कोथरूड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार तीन अज्ञात चोरांच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुंबईला जाण्याचा रस्ता विचारण्यासाठी मुकाई चौक, किवळे येथे थांबले असता, काळ्या कलरच्या दुचाकीवर तीन अज्ञात इसम फिर्यादीकडे आले आणि त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात भा.द.वि कलम 392,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.