शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे मा.चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष शाम जगताप यांच्या शाम भाऊ जगताप युवा मंच वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना वृक्ष वाटप उपक्रम तसेच वृक्षलागवड उपक्रम व कोरोना योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रम 21 जुलै रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजोग वाघेरे , माजी विरोधी पक्षनेते,नगरसेवक नाना काटे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे ,अतुल शितोळे, नगरसेवक राजेंद्र जगताप ,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अमरसिंग आदीयाल ,तानाजी जवळकर , शिवाजी पाडोळे, तृप्ती ताई जवळकर, माजी नगरसेविका सुषमाताई तनपुरे ,उज्वलाताई ढोरे, पुनम ताई जगताप, अश्विनी ताई जगताप, हानुमंत रामभाऊ जगताप, विलासतात्या जगताप , जनार्धन जगताप , रोहिदास जगताप ,मधुकर रणपिसे ,हनुमंत भागुजी जगताप , अशोक जगताप ,दत्तात्रय जगताप, नरेश जगताप, किसन जगताप, ज्ञानेश्वर जगताप , संदीप नलावडे ,संतोष देवकर, कैलास जगताप ,सोमनाथ जगताप ,गणेश काशिद ,आदेश जगताप ,अतुल काशीद , गणेश जगताप ,नयन अहिरे, राजु कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाम भाऊ जगताप युवा मंच वतीने विविध सामाजिक सेवा नागरिकांना पुरविण्यात येत आहेत. यामध्ये आधार स्मार्ट कार्ड तसेच पॅन कार्ड, मतदान कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट इ. कागदपत्रे तयार करून देण्याचे काम करण्यात येत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी कोरोना योद्धांचा सन्मान, सन्मानपत्र फ्रेम, श्रीफळ व शाल, एक वृक्ष रोपटे, व एक मास्क देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रिक्षाचालकांना रिक्षा सेफ्टी कव्हर व एक मास्क वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक शाम भाऊ जगताप यांनी सदर उपक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, सौ विशाखा ताई सोनकांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन ,अमरसिंह आदीयाल व तानाजी जवळकर, यांनी आभार मानले.