केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री असो की बादशाहा असो कारवाई होणारचं. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
Advertisement
“कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री हे फक्त एक व्यक्ती नसून ती संस्था असते. त्यांना संविधानिक दर्जा असतो. तुम्ही राजकीय टीका करा पण ज्याप्रकारे नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंसारखी लोकं आहेत जे मुख्यमंत्र्यांना मारेन असे वक्तव्य करतात. ही काय भाषा आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कोणती भाजपा उभी केली आहे? यावर कायदा आपले काम करेल. तुम्ही मंत्रीमंडळातील मंत्री असाल किंवा बादशहा असाल आम्हाला काही फरक पडत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Advertisement