शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
सत्ताधारी भाजप च्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरा दाम पण करा काम अशी घोषणाबाजी करत प्रतीकात्मक पैशांची हात गाडी महानगरपालिकेच्या मुख्य द्वारा समोर ढकलत आणुन घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका वैशाली घोडेकर, महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, नगरसेवक मयूर कलाटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बू आसवानी, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेवक विक्रांत लांडे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर ,नगरसेवक संजय वाबळे, नगरसेवक अजित गव्हाणे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेवक काळूराम पवार, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेविका शमीम पठाण तसेच आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे करायचे काय खाली डोके वर पाय तसेच पैसे घ्या काम करा अशा घोषणा देत भाजप विरोधात तीव्र असे आंदोलन राष्ट्रवादी वतीने करण्यात आले.
आज स्थायी समितीची बैठक होत असताना राष्ट्रवादी वतीने आंदोलन केल्याने स्थायी समितीची बैठक होते की नाही? असा सर्वांना प्रश्न होता. परंतु आंदोलन संपताच भाजप वतीने स्थायी समितीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली.