शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने रक्त पिण्यासाठी त्याच्याच मित्राच्या गळ्याचा कडाडून चावा घेतला तर दुसऱ्या मित्राने माझे रक्त पिणार का? म्हणत त्याची दगडाने ठेचून हत्या केली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी राहुल लोहार याला अटक केली आहे. तसेच इस्ताक खान असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, इस्ताकने राहुल कडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि राहुलच्या गळ्याचा चावा देखील घेतला होता. याचा राग राहुलने त्याची हत्या करून काढला.
मद्यपान करत असताना इस्ताकने राहुल कडे रक्त पिण्याची इच्छा व्यक्त केली, त्याच्या गळ्याचा कडाडून चावा घेत रक्त पिण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोघांमध्ये वाद झाले, राहुलने स्वतःची कशीबशी सुटका करून तिथून पळ काढला. या घटनेच्या काही तासानंतरच राहुल इस्ताककडे आला. तू माझे रक्त पिणार का? मी तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून दगडाने ठेचून इस्ताकची हत्या केली. या घटनेप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी लोहार याला अटक केली आहे. राहुल आणि इस्ताक हे दोन्ही सराईत गुन्हेगार आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ हे करत आहेत.