शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
नगरसेवक शैलेश मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत “आयुष्यमान भारत’च्या 1143 स्मार्टकार्डचे वितरण करण्यात आले. आनंदनगर येथील नागरिकांना हे स्मार्टकार्ड नगरसेवक मोरे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. कार्ड काढलेल्या नागरिकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचा फायदा मिळणार आहे.
आनंदनगर येथे कामगार, मजूर आणि गरीब नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधेला मुकावे लागते. मात्र, “आयुष्यमान भारत’चे स्मार्ट कार्ड त्यांना मिळाल्याने शहरातील 23 खासगी रुग्णालये व 4 सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधेचा लाभ घेता येणार आहे. आनंदनगर येथे सलग काही दिवस ही योजना राबवून नागरिकांची आयुष्यमान भारत स्मार्टकार्डसाठी नोंदणी करून घेण्यात आली. त्यातील काही जणांना गुरूवारी (दि. 2) नगरसेवक मोरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात स्मार्ट कार्डचे वितरण केले. त्या प्रसंगी बाबा भोईर, एम.ए.गायकवाड, मुन्ना कुरेशी, साकेत ढावरे, ज्योती शिंदे आदी उपस्थित होते. योजनेत नोंदणी केलेल्या आनंदनगर येथील ज्या रहिवाशांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळणे बाकी आहे, त्यांना ते लवकरच देण्यात येणार आहे. योजनेतंर्गत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील 996 उपचार व शस्त्रक्रिया सेवांचा समावेश आहे. त्याशिवाय, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत 1209 उपचार सेवांचा समावेश आहे.