शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य पवन मावळ च्या कार्यअध्यक्ष पदी ज्योतिबा उर्फ ऋषी आयारे यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष गजानन भाऊ चिंचवडे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
आपण समाजात रहतो तसेच ह्या समाजासाठी काहीतरी कार्य आपल्याहातून घडावे हा हेतू समोर ठेऊन, आपण संघटना वाढी साठी सर्वतोपारी सहकार्य करणार आहोत असे मत ज्योतिबा आयारे यांनी मांडले.
पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक गजानन भाऊ चिंचवडे यांनी आपल्या मनोगता मधून आयारे यांना शुभेच्छा दिल्या व संघटने मध्ये जास्तीत जास्त युवकांचे संघटन व्हावे व सामाजिक कार्य त्यांच्या हातून व्हायला पाहिजे असे सांगितले.
प्रसंगी पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन मावळ चे अध्यक्ष अतुल भेगडे, देहूरोड शहर अध्यक्ष लक्ष्मण शेलार उपस्थित होते.