शबनम न्युज | जुनी सांगवी
जुनी सांगवी | प्रतिनिधी
ज्वेलर्स दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोन अनोळखी महिलांनी 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजता च्या कालावधीत आनंद नगर, जुनी सांगवी येथे घडला.
Advertisement
सुधीर रघुनाथ तरटे (वय 30 रा. आनंद नगर जुनी सांगवी) यांनी बुधवारी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमधून गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
Advertisement
Advertisement