शबनम न्युज | सद्र्रुनगर
भोसरी | प्रतिनिधी
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून एकाला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी सकाळी सद्र्रुनगर भोसरी येथे घडली.
शकील जलील शेख (वय 27 रा. सद्र्रुनगर भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदर्श जगताप उर्फ कुक्या आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुरुवारी (दि. 9) सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्यांच्या घरून हिंजवडी येथे जात होते. सद्र्रुनगर येथे रस्त्याने पायी चालत जात असताना, आरोपी रस्त्यात अगोदरच थांबले होते. फिर्यादी यांनी आरोपी आदर्श जगताप याच्या विरोधात यापूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांना अडवले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी आदर्श याने लाकडी बांबू फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.