पुणे | शबनम न्यूज
सदानंद कृष्णा शेट्टी यांनी नुकताच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि यामुळेच सोमवार पेठ व मंगळवार पेठ प्रभाग क्र 16 मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी वाढण्याचा जोर वाढला आहे, असे मत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी च्या महाराष्ट्र महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केल आहे.
Advertisement
प्रभाग क्रमांक 16 येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या महिला शाखेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी चाकणकर बोलत होत्या. याप्रसंगी पुणे शहर अध्यक्षा मृणाली वाणी, शीर उपाध्यक्ष सदानंद शेट्टी, कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्षा मीना पवार, सरीता काळे, वंदना रनसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement