शबनम न्युज | मनोरंजन
प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली.
Advertisement
शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत एनसीबीने १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी चौकशी झाल्यानंतर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला अटक करण्यात आली.आर्यन खानला अरबाज मर्चंटने क्रूझवर आणले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनेक ड्रग्ज पार्ट्यांना अरबाज हजेरी लावत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अरबाज मर्चंटचा फोनमधील चॅटवरुन ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे.
आर्यन खान सह, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज र्मचट यांना अटक करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement