शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गणपतीच्या गाण्यांवरती आॅनलाईन नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचे बक्षिसे वितरण समारंभ संपन्न झाले.
या आॅनलाईन नृत्य स्पर्धेतील पहिला गट 12 वर्षा पर्यंत व खुला गटातील विजेत्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले .
या स्पर्धेत उरवी नाईक – प्रथम , सई इंगोले – द्वितीय , स्वरदा अणावकर – त्रितीय , आंकाक्षा वाडेकर – उत्तेजनार्थ स्पर्धक विजयी झाले . या स्पर्धेकांचे परिक्षण मनसे चित्रपट सेनेचे शहरध्यक्ष प्रज्ञा पाटील व दत्ता घुले यांनी पाहिले .
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे , उपाध्यक्ष अनिकेत प्रभू , आकाश लांडगे , सुमित कलापुरे , रोहित थरकुडे , शंतनु तेलंग , अनिल घोडेकर , सोमनाथ स्वामी , यश कुदळे आदी मान्यवर उपस्थीत होते.