शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आज त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन केला पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणारे हे तीन व्यक्तिमत्व, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक शंकर शेठ जगताप ,दंत चिकित्सा मध्ये उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर आदित्य पतकराव व लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली कुमारी माधुरी भानदास गरुड या तीन व्यक्तींचा सन्मान आज महापौर यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक शंकरशेट जगताप यांनी सिंहगड येथील तानाजी मालुसरे यांच्या समाधीची देखभालीची जबाबदारी स्वखर्चाने उचलली यानिमित्ताने पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला,
तसेच डॉ. आदित्य पतकराव यांचा सन्मान महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्यावतीने करण्यात आला, डॉक्टर डॉ. आदित्य पतकराव यांनी दंतचिकित्सा मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे
तसेच कु.माधुरी भानुदास गरूड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) (ऑल इंडीया रॅक ५६१ ) परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सदिच्छा भेट देऊन सत्कार करून पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या
या प्रसंगी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांच्या सह नगरसेविका शारदा सोनवणे, प्रमोद ठाकर, अजित पसरणीकर, धनंजय ढोरे व युवा नेते उद्योजक जवाहर ढोरे उपस्थित होते.