शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
कोरोना या महामारीमुळे दीड दोन वर्ष बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरु झाली. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिल्या दिवसाचे . औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यतत्पर नगरसेविका अनुराधा देविदास गोफणे व देविदास गोफणे यांनी प्रभागातील शाळांना भेट देऊन सर्व विद्यार्थी यांचे स्वागत केले व विचारपूस केली.
विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना कोरोना विषाणू बद्दल जनजागृती केली.वारंवार हात स्वच्छ धुणे,सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे,सॅनी टायजर चा वापर करणे, एकमेकांनी मित्र-मैत्रिणींची व आई-वडिलांची तसेच आपल्या संपर्कात येणार्या सर्वांचीच काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणून छोटीशी भेट लेखणीचे वाटप प्रत्येकी 1 असे 1000 लेखणीचे वाटप करण्यात आले. यावेळी देविदास गोफणे व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षिका, पालक व विद्यार्थी मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.