शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
महाराष्ट्रातील हिंदू दलितांची वज्रमूठ तयार करून खाटीक, चर्मकार, वाल्मीकी, मातंग समाजाला त्यांचे संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी असल्याचे मत भंडारा विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार तथा हिंदू दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी पुणे येथील विभागीय बैठक व चर्चासत्रात व्यक्त केले. या बैठकीत अनुसुचित जाती मधील 58 जातींना आरक्षणाचा लाभ कसा मिळवता येईल या विषयी चर्चा झाली .
हिंदू दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी हिंदू दलित महासंघाचे विस्तारीकरण करण्यासंदर्भात पुणे विभागीय दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
त्याच बरोबर हिंदू दलितांमध्ये चर्मकार, मातंग, वाल्मिकी, सुदर्शन, खाटिक समाजात मोठ्या प्रमाणात दुही असल्याने शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात नाहीत. त्याकरिता राज्यातील कानाकोपऱ्यात जाऊन हिंदू दलितांमधे आत्मभान देण्याचे कार्य देखील हिंदू दलित महासंघाच्या माध्यमातून भविष्यात करण्यात येणार आहे, असेही भोंडेकार म्हणाले.
या प्रसंगी हिंदू दलित महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश चकणे, शंकर राव वानखेडे, महिला नेत्या भारती कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकुलसचिव दिगंबर नेटके, राजु अहिरे, प्राध्यापक राजन शिंदे, गणेश भाग्यवंत, सतीश बटेलु, शिरीष रोच, एडवोकेट अमित कोथमिरे, अमीत तांडेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी हिंदू दलित महासंघाचे पुणे विभागीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये चर्मकार समाजाचे विभागीय समन्वयक म्हणून दीपक परदेशी यांची निवड करण्यात आली. वाल्मीकि सुदर्शन समाजाचे विभागीय समन्वयक म्हणून दीपक परदेशी, मातंग समाजाचे विभागीय समन्वयक म्हणून राजेंद्र शिंदे, खाटीक समाजात विभागीय समन्वयक म्हणून सुनील कांबळे, गुलाबराव चव्हाण यांची विभागीय संघटक म्हणून निवड करण्यात आली, तर विभागीय सचिव म्हणून सुधीर मुंजे, सतीश पटेल यांची निवड करण्यात आली. विभागीय सचिव म्हणून विजय घासे यांची निवड करण्यात आली तर हिंदू दलित महासंघाचे कार्यकारणी सदस्य म्हणून बबलू सोळुंके सातारा, कैलास उत्तम नगर पुणे, विशाल आहिरे पुणे, विशाल शिंदे पुणे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.