शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नगरसेविका प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गवळीनगर प्रभागात महिलांसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम सतत राबवित असतात.
या कोरोना काळातही वर्षभर बारसे यांनी न थकता गवळीनगर परिसरात धान्य वाटप, आरोग्य शिबिर, डॉक्टर तुमच्या दारी ,रक्तदान शिबिर,आरोग्य सेवकांना सॅनिटायझर ,मास्क, हॅन्ड ग्लोज, प्रभागातील शाळांना शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मास्क सॅनिटायझर ,पालावरील मुलांना अन्नदान अशा अनेक उपक्रमातून त्यांनी त्यांचे काम चालूच ठेवले होते.
त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटलेला परिसरात पाहायला मिळतो .
गुढीपाडव्याच्या वेळी लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा, नागपंचमीच्या काळात महिलांसाठी मेहंदी स्पर्धा, पाककला स्पर्धा अशा उपक्रमांमधून त्यांनी महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळतील असे कार्यक्रम राबवले .
नुकतेच गौरी-गणपतीचे दिवस येऊन गेले. या गौरी-गणपतीच्या काळातही नगरसेविका बारसे यांनी घरगुती गौरी गणपती सजावट सेल्फी स्पर्धा आयोजित केली होती व यात पहिला दुसरा तिसरा असे नंबर न करता स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला एक आकर्षक सुंदर साडी मिळेल असे जाहीर केले होते आणि त्यानुसारच नुकताच नगरसेविका प्रियांका बारसे यांनी प्रभागातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करून १०४ सहभागी महिलांना सुंदर अशा साड्यांचे वाटप करून त्यांच्या कलागुणांना एक शाब्बासकीची थाप दिलेली आहे .
या कार्यक्रमाच्या वेळी प्रभाग अध्यक्षा अनुराधा ताई दौंड व भाजपाच्या प्रभाग महिला कार्यकारणी सदस्य सविता वाघ, कविता थिगळे, रेश्मा बनसोडे , कान्होपात्रा थोरात, अनुसया साळुंखे,रागिणी जाधव व परिसरातील महिलांनी उत्साहाने कार्यक्रमाच्या वेळी उपस्थिती लावून कार्यक्रमाला शोभा आणली.
नगरसेविका प्रियांका बारसे यांनी कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून महिला सक्षमीकरणावर महिलांना मार्गदर्शन केले. तर प्रभागातील स्नेहल भुजबळ, हेमांगी बो-हाडे, रेश्मा बनसोडे,कविता थिगळे यांनी मनोगतातून प्रियांका बारसे प्रभागात करत असलेल्या कामाचे व त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीचे कौतुक केले व पुढील वाटचालीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा विश्वास बोलण्यातून व्यक्त केला.