शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पोलीस जाणीव सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा रवी फडणीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेश कार्याध्यक्ष रमेश बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख मा प्रा अरविंद साळवे सर यांच्या नेतृत्वाखाली व पुणे जिल्हा अध्यक्ष अजित गायकवाड सर व ऍड. प्रवीण गायकवाड सर यांच्या अथक प्रयत्नाने वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगळीकर साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मा. मुगळीकर साहेबानी पोलिसांची भूमिका विशद केली.पोलीस हे जनतेच्या हितासाठी काम करतात चांगल्या लोकांच्या नेहमीच पाठीशी असतात तर द्रुष्ट प्रवृत्तींना आळा घालून समाजात शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात त्या साठी जनतेचे पोलिसांना सहकार्य असणे गरजेचे असते या कामी पोलीस जाणीव सेवा संघ चांगले कार्य करत आहे हे सांगून संघाच्या पुढील कार्याला शुभेच्या दिल्या.प्रास्ताविक करतांना प्रा. अरविंद साळवे सर यांनी पोलीस जाणीव सेवा संघाचे ध्येय आणि उद्दीष्ट्ये सांगितले तर प्रदेश कार्याध्यक्ष मा. रमेश बनसोडे सरांनी उपस्थित जनतेला पोलिसांप्रती आपले काय कर्तव्ये आहेत याची माहिती दिली. आणि पोलीस जाणीव संघ सततच प्रशासनाला सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमात नवनियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जण महाराष्ट्र न्युज चे संपादक मा. दादाभाऊ आढाव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील सर्वानी परिश्रम घेतले. पोलीस जाणीव संघ पुणे जिल्हा सचिव मा. प्रा.भारत साळवे सर, सहसचिव मा.दीपक रणदिवे ,प्रा. दीपक खाकाळ सर,मा.विकास बारणे सर ,मा. अमर चौरे सर मावळ तालुका अध्यक्ष ,मा. विशाल खुणे सर,संतोष सोनावले सर, मा.बिपीन खैरे मा. सविता बागडे मॅडम तसेच भिमज्योत मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि थेरगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थिती होते.