शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्र 11 मध्ये सारिका ताई पवार(शहरअध्यक्ष ओबीसी महिला रा.कां.पिं.चि. शहर अध्यक्ष एकता प्रतिष्ठान ) यांच्या वतीने पूर्णांनगर, शिवतेजनगर व तसेच कृष्णा नगर मध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व महिलांचा नवदुर्गा सन्मान म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिलांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच पाककला स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग घेऊन उत्कृष्ठ पाक कलेचे व रांगोळी चे नमुने सादर केले. या कार्यक्रमासाठी गंगा ताई धेंडे (अध्क्षय-सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), भारती काकू मोरे ,सरिता ताई शिंदे, प्रणिता ताई शिंदे ,डॉ अक्षदा थोरात ,संगीता ताई सुरने, वर्षा गारगोटे, सिंग भाभी,आदी उपस्थित होत्या. तसेच यावेळी विजेत्या महिलांना उत्कृष्ट बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.