शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ डिसेंबर) :- चिंचवड येथील प्रभाग क्र.19 मधील मनपाचे अ प्रभाग अध्यक्ष तथा नगरसेवक शैलेश प्रकाश मोरे यांच्या वतीने एम्पायर इस्टेट व परिसरातील नागरिकांसाठी मोफत आधुनिक ॲक्युप्रेशर थेरेपी शिबिर दि. 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले होते.दरम्यान थेरेपीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
साधारणपणे शिबिरादरम्यान दररोज दीडशे ते दोनशे लोकांनी शिबिराचा लाभ घेतला व त्याचबरोबर थायरोकेअर व सचिन लॅबोरेटरीज यांच्यामार्फत शरीराच्या कोणत्याही लॅब टेस्टसाठी लाईफ टाईम 20% डिस्काउंट कार्डची दररोज 90 ते 100 नागरिकांनी नोंदणी केली. साधारणपणे 9 ते 15 डिसेंबर दरम्यान पंधराशे ते सोळाशे नागरिकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला. त्यासाठी एम्पायर इस्टेट येथील चेअरमन पिंगळे साहेब, शेवाळे साहेब व फेडरेशन 1 चे सदस्य अधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले. त्याप्रसंगी नगरसेवक शैलेश मोरे यांनी कार्यक्रमाचे सांगतेच्या वेळी नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचे आभार मानले. तसेच डॉक्टर साळुंखे आणि त्यांच्या टीमने व सचिव लॅबोरेटरीज यांचे आभार मानले.