शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त थेरगाव परिसरातील राष्ट्रवादीचे नेते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य संभाजी बाळासाहेब बारणे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती थेरगाव, शिवतीर्थनगर कार्यालय येथे संपन्न झाली.
आपल्या देशाला स्वतंत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने मिळवून दिला, आपण त्यांची शिकवण अंगीकारली पाहिजे तसेच महात्मा गांधी सारखे व्यक्तिमत्व यापुढे आपल्या भारत देशात होणे नाही,गांधींजींच्या विचाराची प्रासंगितता, सार्वकालिकता संपलेली नाही.पर्यावरण प्रेम, शाश्वत विकास, खेडयाकडे जाण्याची प्रेरणा अशा अनेक गोष्टी आपण आजही पाहू शकतो. चंगळवाद, द्वेषाचे राजकारण, भांडवलशाहीला गांधीवाद हेच उत्तर आहे. गांधींना टाळता येणार नाही ‘.अशा शब्दात संभाजी बारणे यांनी महात्मा गांधी यांना अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेविका उषाताई चोरडिया यांच्यासह संभाजी बारणे यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.