शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
भोसरी – जे.एस.पी.एम.लातूर शैक्षणिक संस्थेने शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अध्यात्म, विज्ञान आणि व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षणातून आदर्शवान विद्यार्थी घडविण्याचे कार्य गेल्या 38 वर्षापासून करीत आहे. संस्थेचा विस्तार लातूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक युनिटच्या माध्यमातून केला आहे. गुणवत्ता, प्रशासन विविध उपक्रमामुळे संस्थेच्या विविध युनिटने आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.
संस्थेच्यावतीने गेली 10 वर्षापासून काळेवाडी रहाटणी, पिंपरी चिंचवड येथे स्वामी विवेकानंद सी.बी.एस.ई.स्कूल चालवली जाते. इंद्रायणी नगर भोसरी येथे अराईज इंटरनॅशनल स्कूलसाठी भव्य अशी इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन व रावेत येथील नवीन अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या इमारतीचे भूमीपूजन माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष मा.आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते ठेवण्यात आलेलेे आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून या भागातील मा.आ.महेशदादा लांडगे हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, मा.मंत्री आ.गिरीषजी महाजन, मा.आ.लक्ष्मणराव जगताप, मा.आ.विलासराव लांडे, महापौर पिंपरी चिंचवड सौ.उषाताई ढोरे, महापालिका गटनेते एकनाथराव पवार व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रावेत येथील भूमिपूजनाचा कार्यक्रम दि.23 ऑक्टोबर 2021 रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता तर 10.30 वा. अराईज स्कूल, भोसरी येथील नूतन इमारतीच्या उद्धाटनाचा मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती जे.एस.पी.एम.लातूर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली.