शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या प्रभाग क्रमांक तीस मधील फुगेवाडी येथील श्रावस्ती बुद्ध विहार येथे दुरूस्ती विषयक कामे तसेच वॉटरप्रूफिंग व पेंटिंग कामे करण्यात आली आहे या काम मुळे श्रावस्ती बुद्धविहाराचे कायापालट होत आहे या सर्व विकास कामांची पाहणी नगरसेवक राजू बनसोडे यांनी केली तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या या वेळी जाणून घेतल्या व लवकरात लवकर या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले , नगर सेवक राजू बनसोडे आपल्या प्रभागात एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून ओळखले जातात. प्रभागातील नागरिकांच्या समस्या नेहमीच जाणून ते सोडविण्याचे प्रयत्न करतात प्रभागातील अनेक विकासकामं बाबत तत्परतेने काम करून संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या विविध अडचणी समस्या सोडविण्याच्या सूचना यावेळी नगरसेवक राजू बनसोडे यांनी दिल्या