शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिवाळीचे गिफ्ट दिले ते म्हणजे दिपावली पहाट कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात 1 कोटी 17 लाख जणांचे लसीकरण झाले असल्याची माहिती आज पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी दिली.
Advertisement
दिवाळीनंतर 100 टक्के क्षमतेने थिअटर सुरू करण्याचा विचार आहे. तसेच गेल्या 9 दिवसांत लसीकरणात वाढ झाली आहे. राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळले. पुणे मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ राबविला जाणार. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरू होईल, असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
Advertisement