शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुब शेख यांच्या सहकार्याने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त गरीब कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंची कीट तसेच ब्लँकेट वाटप करण्यात आले तसेच आज जीवनावश्यक वस्तूंची किट व ब्लॅंकेट पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक रवी लांडगे यांच्या उपस्थितीत गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले.
Advertisement
सदर कार्यक्रम हा पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे संपन्न झाला यावेळी आयुब भाऊ शेख, खान शेख, गुल्फराज शेख, शुभम आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement