शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
वर्ल्ड चॅम्पियनशिप इजिप्त येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रभागातील कुमारी दिव्या विकास वर्पे हिने 48 किलो वजन गटांमध्ये गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्याने 50 किलो वजन गटांमध्ये आपल्या प्रभागातील दुसरा खेळाडू कुमार गौरव कांताराम भोईर सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल आज दोघांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी पुणे स्टेशन येथे ही जाऊन स्वागत केले.
तसेच त्यांच्या स्वागता निमित्त दोघांचाही प्रभाग 8 इंद्रायणीनगर मध्ये भव्य स्वागत करून त्यांना पेढा भरून श्री वैष्णव माता मंदिरामध्ये दोघांच्या शुभहस्ते मातेची महाआरती करून सत्कार करण्यात आला. तसेच वैष्णव माता मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच यावेळी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी कु.दिव्या विकास वर्पे व कु. गौरव कांताराम भोईर दोघांनाही भविष्यकाळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.