शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्र. १४ व प्रभाग क्र. १५ मध्ये धुर फवारणी व कीटकनाशक औषध फवारणी करण्यात यावी,अशी मागणी संस्थापक/अध्यक्ष विठ्ठल प्रतिष्ठाण निखिल दळवी यांनी मुख्य आरोग्य अधिकारी अ क्षेत्रीय कार्यालय निगड़ी पुणे -४४ यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक 14 मधील विठ्ठलवाडी, दत्तवाडी, विवेक नगर, तुळजाई वस्ती, टेल्को कपूर सोसायटी, क्रांति नगर ,रुपेश कॉलनी, सुभाष पांढरकर नगर, भंगार वाडी व प्रभाग क्रमांक 15 मधील आकुर्डी गाव, पंचतारा नगर, गुरुदेव नगर, सुदर्शन नगर, गणेश नगर, गंगा नगर या सर्व भागातील परिसरामध्ये डासांचे प्रमाण खूप वाढले असल्याने या डासांपासून डेंग्यू, मलेरिया, हिवताप अशा प्रकारचे आजार होऊ नये, या सर्व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू नये, यासाठी आपल्या आरोग्य विभागामार्फत दर दोन दिवसाआड धूर फवारणी व कीटकनाशक औषध फवारणी करण्यात यावी, दोन्ही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात उघडे ओढे नाले आहेत. त्यांची वेळोवेळी साफसफाई करण्यात यावी, बऱ्याच ठिकाणी ओढे ची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे परिसरात मच्छर, डास, कीटकनाशक यांचा प्रादुर्भाव वाढत असतो. त्यामुळे प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतो या सर्व बाबींचा विचार करता प्रभाग क्रमांक 14 व 15 मधील सर्व भागांमध्ये लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, असेही दिलेल्या निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.