नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन वतीने आयोजित मोरया दीपावली फेस्टिवल 2021 संपन्न
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन वतीने दिवाळीनिमित्त मोरया दीपावली फेस्टिवल 2021 आयोजित करण्यात आला होता. वाल्हेकरवाडी पोलीस स्टेशन जवळील मैदानात गेली दहा-बारा दिवस या फेस्टिवलचे आयोजन सुरू होते. या मोरया दीपावली फेस्टिवल मध्ये दिव्यांग बांधवांनी सदाबहार गीतांचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर करून या दीपावली फेस्टिवल मध्ये बहार आणली.
मोरया दीपावली फेस्टिवल मध्ये विविध कलागुणांना वाव देण्याकरिता विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी दिव्यांग बांधवांनी सादर केलेल्या गीतांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दिव्यांग बांधवांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्या करिता सामाजिक कार्यकर्ते कुंकूलोळ यांचे सहकार्य लाभले.
नगरसेविका सौ करुणा शेखर चिंचवडे व युवा नेते शेखर अण्णा चिंचवडे यांच्या वतीने नेहमीच असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या दिवाळीनिमित्त मोरया दीपावली फेस्टिवल आयोजित करून त्यांनी आपल्या या कार्यात मोलाची भर पाडली आहे. अनेक नागरिकांनी कुटुंबांनी या मोरया दीपावली फेस्टिवल चा आनंद मनमुराद लुटला.