शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ मामा यांचा आमदार लक्ष्मण जगताप व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष अनुप मोरे व भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे प्रभारी संतोष कलाटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला .
यावेळी त्यांच्या समवेत अक्षय मोहिते, प्रशांत मोहिते, विकी कदम, अनंत पडवळ ,अजय चव्हाण रवी मोहिते, संदीप कदम ,मयूर मोडवे विनोद भाऊ पासलकर अजय भाऊ थोरात, राजू मारटकर आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी एकनाथ मामा यांनी लांडेवाडी परिसरातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे विचार जन माणसांत पोहचविण्याची व पक्षकार्य एकनिष्ठेने करण्याचे ग्वाही दिली.