शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्र. 23 थेरगाव मधील सर्व मुख्य चौकांचे सुशोभीकरण करा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती, नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. 23 थेरगाव मधील परिसर काही वर्षांत झपाट्याने विकसित झाला असून, थेरगावातील सर्व मुख्य चौकांचे महानगरपालिकांमार्फत मातृत्व, संस्कार, भक्ती-शक्ती, आय लव्ह थेरगाव अशा विविध संकल्पना वापरून सुशोभित करण करण्या बाबत 13/01/2020 व 30/03/2021 रोजी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजतागायत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
सदर विषयांकित कामाकरिता मी स्थानिक नगर सदस्य असताना दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आलेला असताना देखील कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. तर सर्वसामान्यांचे किती हाल होत असतील त्यामुळे सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे. तरी प्रभाग क्रमांक 23 थेरगाव येथील सर्व मुख्य चौकाचे सुशोभिकरण करण्यात यावे, असेही सदर निवेदनात नगरसेविका मनिषा पवार यांनी नमूद केले आहे.