शबनम न्यूज :- अहमदनगर ( दि.१७ नोव्हेंबर ) प्रतिनिधी :- अहमदनगर तारकपूर एसटी आगारामध्ये एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन चालू आहे. तरी एसटी कामगारांच्या सरकार दरबारी असलेल्या मागण्या त्यांनी त्वरित मान्य कराव्यात यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार हक्क राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नानासाहेब जगताप यांनी एसटी कर्मचाऱ्यांना निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला. शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत एसटी कामगारांना कमी वेतन आहे तरी सरकारने त्यांना योग्य न्याय द्यावा त्यांच्यावर अन्याय करू नये सरकारने दिलेल्या वेतनातून त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविणे कठीण झाले आहे ,अशा परिस्थितीमध्ये आलेल्या नैराश्यातून ते आत्महत्या करत आहेत, तरी सरकारला विनंती आहे आपण एसटी कर्मचारी बंधू-भगिनी च्या मागणीला न्याय द्यावा राष्ट्रीय मानवाधिकार हक्क एसटी कामगारांच्या सोबत ठामपणे उभे आहे .
महाराष्ट्र राज्याचे प्रमुख सल्लागार पत्रकार आबासाहेब शिरसाठ म्हणाले एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलीनीकरण करून शासन निर्णय प्रमाणे सर्व सोयी सवलती व वेतन लागू करण्यात यावे या मागणीसाठी राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे .
यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार हक्क संघटनचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष हेमलता कांबळे म्हणाल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी एसटी कर्मचारी नेहमी तत्पर असतात ते त्यांचा जीव धोक्यात घालून वाहक प्रवाशांचा प्रवास सुखाचा कसा होईल याची काळजी घेतो त्यांच्यामुळे प्रवासी सुखरूप आपल्या कुटुंबात जातो एसटी कर्मचाऱी सुखी तर प्रवासी जनता सुखी तोच जरदुखी तरजनता प्रवासी सुखरूप कशी राहील दिवाळी मध्ये एसटी कामगारांच्या बंद मुळे नागरीकाना समजले आहे आमचा महिला आघाडी चा कर्मचारी बंधू-भगिनींना जाहीर पाठिंबा आहे .
यावेळी प्रदेशाध्यक्ष शंकराव कनगरे प्रदेश कार्याध्यक्ष उद्धवराव अमृते महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष हेमलता कांबळे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष परमेश्वर बडे जिल्हा महिला अध्यक्ष आकांक्षा पवार महाराष्ट्राचे मीडिया अध्यक्ष वैशाली राजहंस राज्याच्या कार्याध्यक्ष रंजना उकिरडे महाराष्ट्र राज्य सचिव भोसले मॅडम गौतम पवार सागर घाडगे सचिन ससाने अविनाश पवार अदि मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.