शबनम न्यूज | पुणे (दि.०३ डिसेंबर) :- विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहायक निलिमा आहेरकर यांचा सेवापूर्तीनिमित्त त्यांना पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.
श्रीमती आहेरकर या 33 वर्षे सेवा करुन 30 नोव्हेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी विभागीय माहिती कार्यालयात लेखा, लोकराज्य व प्रदर्शन यासारखे महत्त्वाचे विभाग सांभाळले असल्याचे नमूद करुन डॉ. पाटोदकर यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आहेरकर यांनी कर्तव्यभावनेने आपली जबाबदारी सांभाळली. त्यांचे अभ्यासूवृत्ती आणि सहकार्याची भावना हे गुण इतर कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शक आहेत असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, माहिती अधिकारी सचिन गाढवे, माहिती सहायक गणेश फुंदे, मिलींद भिंगारे यांनी आपले मनोगतात श्रीमती आहेरकर यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.