शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.०७ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष नवनाथ मारुती ढवळे यांच्या वतीने उत्पत्ती एकादशी चे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 25 मधील पुनवळे परिसरातील गरीब व गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले,तसेच गरीब कुटुंबातील मुला-मुलींना खेळणी, व कपडे वाटप करण्यात आले.
“गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा” या अनुषंगाने आपण समाजाचे प्रती काही देणे लागतो या भावनेने या प्रभागातील गरीब कष्टकरी व गरजू कुटुंबांना आपण एक मदतीचा हात दिला आहे अशी प्रतिक्रिया या वेळी नवनाथ मारुती ढवळे यांनी दिली.
यावेळी नवनाथ मारुती ढवळे यांचे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच परिसरातील नागरिक युवक-युवती ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .आपल्या प्रभागात असे सामाजिक कार्य राबविण्यात येत असल्याने या प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.