शबनम न्यूज : मुंबई (दि.०९ डिसेंबर) :- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.अजितदादा पवार यांना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शुभेच्छा देताना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्ष नेता राजू मिसाळ,शहर प्रवक्ते फजलभाई शेख, शहर उपाध्यक्ष संतोष वाघेरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज पहिल्याच दिवशी मागे घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
Advertisement