शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०९ डिसेंबर) :- नुकत्याच सर्वत्र संपन्न झालेल्या जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल (प्रांत ३२३४ डी २) आणि इनालि फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०३ जानेवारी २०२२ ते ०८ जानेवारी २०२२ या कालावधीत अपंग व्यक्तींना कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट), स्वयंचलित हात, गुडघ्यातील क्लिप, कुबड्या, काठी इत्यादी साधनांचे विनाशुल्क वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब इंटरनॅशनल (प्रांत ३२३४ डी २) चे जिल्हाध्यक्ष दामाजी आसबे यांनी पुनावळे येथे झालेल्या बैठकीत दिली. हसमुख मेहता, नेमीचंद बोरा, मनोज बन्सल, राजश्री शहा, डॉ. अस्मिता सुराणा यांनी यावेळी लायन्स क्लबच्या विविध सभासदांना शिबिराच्या संदर्भात माहिती दिली; तसेच इनालि फाउंडेशनच्या अनिकेत आणि महिमा सिन्हा यांनी कृत्रिम पायरोपण आणि स्वयंचलित हात याविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले.
सदर शिबिर पुणे शहराबरोबरच पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात खालीलप्रमाणे आयोजित केले जाणार आहे –
सोमवार, ०३ जानेवारी २०२२ रोजी भोसरी, निगडी, रहाटणी येथे
मंगळवार, ०४ जानेवारी २०२२ रोजी भोसरी, सासवड, पिरंगुट येथे
बुधवार, ०५ जानेवारी २०२२ रोजी भोसरी, चाकण, शिक्रापूर येथे
गुरुवार, ०६ जानेवारी २०२२ रोजी भोसरी, लोणावळा, खोपोली येथे
शुक्रवार, ०७ जानेवारी २०२२ रोजी भोसरी, दादावाडी, पुणे येथे
शनिवार, ०८ जानेवारी २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी येथे प्रांतपाल हेमंत नाईक आणि इनालि फाउंडेशनचे प्रशांत गाडे यांच्या उपस्थितीत जयपूर फूट आणि स्वयंचलित हात यांचे वितरण करण्यात येईल. संपूर्ण शिबिराची वेळ सकाळी ०९:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत राहील.
गरीब आणि गरजू व्यक्तींनी तसेच सेवाभावी संस्थांनी जास्तीत जास्त अपंग व्यक्तींशी संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लायन दामाजी आसबे (भ्रमणध्वनी ९७६७१०२७१७),
लायन नेमीचंद बोरा (भ्रमणध्वनी ९३७०१४८१५१),
लायन सुनील चेकर (भ्रमणध्वनी ९८२३१४४१४०)
यांनी केले आहे.