गजाला सय्यद
शबनम न्यूज | मुंबई (दि.११ डिसेंबर) :- कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत राज्यस्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाइन महारोजगार मेळावा 2021 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दिनांक 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाला भेट देऊन नोकरी साधकाने (job seeker) नोंदणी करावी. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या टॅबमध्ये ऐच्छिक जिल्हा निवडून फिल्टर या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर vacancy listing हा पर्याय निवडून पात्रतेनुसार इच्छुक पदाकरिता अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज करताना काही समस्या निर्माण झाल्यास संबंधित जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.