शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१७ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्र .2. बो-हाडेवाडी देऊरस्ता ते इंद्रायणीनदी पर्यतच्या आजुबाजुच्या परिसरात wd-4 टाकीमधुन पाणीपुरवठा होत असुन तो पुरेसा नसल्यामुळे तसेच वरील भागामधील सततच्या वाढत्या नागरिकीकरण च्या मागणीनुसार पाणीपुरवठा करण्यास मर्यादा येत आहे. सदरचे नियोजित पाण्याच्या टाकीमुळे गंधर्व एक्सलस 1.2. मंत्रा सोसायटी, ग्रीन स्केअर सोसायटी, बालाजी विश्व.सोसायटी के .के. कायझन सोसायटी, आंशुन काँसमाँस सोसायटी , सिल्वर ओक्स सोसायटी, सिल्वर 9.प्रिस्टिन ग्रीन सोसायटी ,स्वराज सोसायटी ,शुभनिर्मिती सोसायटी ,नागेश्वरनगर,तुपेवस्ती, इंद्रायणीपार्क,अनंतनगर,संभाजीनगर,11cunty,सोसायटी,तुलसी अंगण सोसायटी, रिव्हरब्रीज सोसायटी,सुमेरो सोसायटी ,गायकवाड वस्ती,गणेशनगर, कमलराज सोसायटी , वूडसविल्हा फेज 1.2.3. रोझ गँलक्सी सोसायटी ,सावलीया सोसायटी ,जी.के पँलिसीयो फेज,1.2. सह्याद्री श्रुबेरी सोसायटी डिवाईन सोसायटी .क्वीन्सलँड सोसायटी, शिवरोडवरील सर्व सोसायटी या भागातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.तरी पाण्याची टाकी चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे . अशा मागणीचे निवेदन या प्रभागातील नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिले आहे.
याबाबत माहिती देताना नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी म्हंटले आहे कि, आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने २०१७ साल पासुन पाण्याच्या टाकीसाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आले आहे. बो-हाडेवाडी परिसरासाठी २०लाख लिटर च्या दोन पाण्या च्या टाकी च काम सुरु आहे.पण प्रभागातील वाढती लोकसंख्या पाहता अजुन २५ लाख लिटर पाण्याची टाकी ची आवश्यकता होती. या मुळे भामा आसखेड वरून येणारे पाणी या नविन पाण्याच्या टाकी मध्ये येणार आहे. प्रभाग क्र .2 बो-हाडेवाडी ते इंद्रायणी नदी पर्यत च्या परीसरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
महानगरपालिकेच्या चार वेगवेगळ्या निविदे अंतर्गत २९ नविन उंच पाण्याच्या टाक्या च नियोजन करण्यात आले आहे .त्या निविदेतील १पाण्याची टाकी या प्रभागातील बो-हाडेवाडी मध्ये घेण्यात यावी व त्या साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे निवेदन दिल्यांनतर मनपा आयुक्तांनी सदरचे काम लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. या मुळे प्रभागातील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.