पीसीईटीचा एक्स्पोनेशीअल इंजिनिअरींग बरोबर बी. व्होकच्या इंटर्नशीपसाठी सामंजस्य करार
शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.२३ डिसेंबर) :- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) मध्ये ‘बँचलर ऑफ व्होकेशनल (बी. व्होक.) या तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2021 – 22 साठी प्रवेश सुरु करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाच्या मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग, इंटरनेट ऑफ स्थिंग्ज, इंडस्ट्रिअल रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कँडिशनिंग आणि सोलार सिस्टीम या चार शाखांमध्ये प्रवेश सुरु आहेत. हा पुर्ण अभ्यासक्रम कौशल्याधिष्ठीत आहे. अशी माहिती पीसीईटीच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना साठ टक्के अभ्यासक्रम औद्योगिक आस्थापनांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंगव्दारे पुर्ण करायचा आहे. या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासन, युजीसी, एआयसीटीई आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल कौशील ऑफ इंडीयाची मान्यता आहे. हा अभ्यासक्रमात मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झीट प्रकारात उपलब्ध आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांने जर सहा महिन्यानंतर शिक्षण थांबल्यास प्रवेश घेतलेल्या शाखेचे सर्टीफिकेट, प्रथम वर्षानंतर शिक्षण थांबल्यास डिप्लोमा सर्टीफिकेट, व्दितीय वर्षानंतर ॲडव्हान्स डिप्लोमा व तृतीय वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल. मध्येच शिक्षण थांबवून पुन्हा नंतर सोयीस्कर पुन्हा प्रवेश घेता येईल. या विद्यार्थ्यांना शिक्षत असताना औद्योगिक आस्थापनांमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग मिळावे यासाठी पीसीईटीच्या वतीने एक्स्पोनेशीअल इंजिनिअरींग प्रा. लि. बरोबर हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारावर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एक्स्पोनेशीअल इंजिनिअरींगचे अध्यक्ष ओमप्रकाश पेठे यांनी सह्या केल्या आहेत.