पुरुषोत्तम फिल्म अँड ऍक्टींग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन सोहळा संपन्न
शबनम न्यूज | पुणे (दि.२३ डिसेंबर) :- पुरुषोत्तम फिल्म अँड ऍक्टींग इन्स्टिट्यूट नव्या जोमाने चित्रपट क्षेत्रात आपल करिअर करु इच्छिणाऱ्या नव युवकांना नवनवीन आधुनिक कोर्सेस घेऊन आले आहे. त्यामूळे कला क्षेत्रात आपलं ठसा उमटवू पाहणाऱ्याला संधी प्राप्त झाली आहे. अशा ह्या पुरुषोत्तम फिल्म अँड ऍक्टींग इन्स्टिट्यूट चा भव्य उद्घाटन सोहळा कला क्षेत्रातील विविध मान्यवरांच्य उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेते सुनील गोडबोले, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे उपाध्यक्ष गणेश मोहिते, अभिनेत्री वैष्णवी पाटिल, ओ शेट फेम उमेश गवळी, दिग्दर्शक अमित कोळी, लेखक कल्पेश जगताप, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना सुरेश भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरुषोत्तम फिल्म अँड ऍक्टींग इन्स्टिट्यूट मध्ये “शिकाल तर नक्कीच टीव्ही वर दिसाल” या टॅग लाईन वर विवीध कमी कालावधीचे कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुरुषोत्तम फिल्म अँड ऍक्टींग इन्स्टिट्यूट मधे अभिनय प्रशिक्षण राहुल बलवंत आणि अभिषेक शिंदे देणार आहेत. तर स्क्रीन प्ले दिग्दर्शक नितीन सुपेकर, कोरिओग्राफी अक्षय पितळे, सह दिग्दर्शन आणि ब्युटी ट्रेनर नीतू झा, सह दिग्दर्शन स्नेहा केदारी, व्यवस्थापन हेमांगी काकडे, सूरज वमन, आदित्य गंभीर आणि शुभम चव्हान आदी तज्ञ प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
पुरुषोत्तम फिल्म अँड ऍक्टींग इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत पाटील तर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय घाडगे आहेत. ऑफिस नंबर ३०, सी विंग, चौथा मजला, के. के. मार्केट, बालाजी नगर, पुणे येथून हि संस्था चालू असणार आहे. कला क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना 9096999614/18 वर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.